Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 27, 2025
डायल 112 वर कॉल करून पोलिसांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी एका विरोधात वैजापूर पोलिसांत मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रकरणात पोलिस कॉन्स्टेबल ऋषिकेश पैठणकर यांनी फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ते ड्युटीवर असताना डायल 112 वर कॉल आला. कॉल वर भारत नगर येथे गायच्या मांसची विक्री होत असल्याचे सांगण्यात आले.पोलिसांनी तपासणी केल्यावर माहिती खोटी ठरली.प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.