तुमसर तालुक्यातील परसवाडा येथे दि. 23 ऑगस्ट रोज शनिवारला दुपारी 4 वा.च्या सिहोरा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे जुगार अड्ड्यावर धाड घालून जुगार खेळणारे आरोपी लोकेश आमकर, रतन गोपाले, मनोज मारबते, उमाशंकर दयाले, शामलाल भेदे, कमलेश गहले, राधेशाम येडे यांना ताब्यात घेत आरोपीच्या ताब्यातील नगदी 1 हजार 500 रु. एक मोबाईल व एक मोटरसायकल असा एकूण 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार बंदी कायदा अन्वये सातही आरोपीविरुद्ध सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.