सेलू तालुक्यातील सोना येथील पवन मगर या तरुणाने दारूच्या नशेत गळफास घेतल्याची घटना 21 ऑगस्ट रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. सेलू पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद. घरातील लोखंडी अडूला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मयताचे वडील सुभाष मगर यांनी पोलिसांना दिली . पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.