शहरातील बीएसएनएल कार्यालय परिसरात असलेल्या सर्व धर्म समभावाचे प्रतीक हजरत सय्यद अखुंद शाह बाबा रह. सरवरे अजीज यांचा तीन दिवसीय उर्स आयोजित करण्यात आला असून 15 मे पासून याची सुरुवात होणार आहे.16 मे रोजी संदल मिरवणूक. 17 मे रोजी सुलतान नाझा यांचा कव्वाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पंधरा मे ते 17 मे पर्यंत हा उर्स चालणार असून या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आज बुधवार 14 मे रोजी संध्याकाळी 7 30 वाजता उर्स कमिटीच्या वतीने देण्यात आली.