नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात सार्वजनिक गणेशोत्सव 2024 पारितोषिक वितरण सोहळा पोलीस आयुक्त कार्यालयात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सरोज अहिरे,जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते.सार्वजनिक गणेशोत्सव 2024 मध्ये उत्कृष्ट कामगिरी व उल्लेखनीय देखावा सादर केल्याप्रकरणी गणेश मंडळांना सन्मानित करण्यात आले.