राजुरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये पोलीस विभागाच्या वतीने नशामुक्ती अभियानाचे आयोजन आज दि 21 आगस्ट 12 वाजता करण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित केले.या विशेष जनजागृती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य किशोर उईके होते.कार्यक्रमात सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पवार, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण लोकरे,परागकुमार उलीवार यांचीही उपस्थिती लाभली.