✦ शॉर्ट न्यूज ✦ बीडच्या गेवराई तालुक्यातील रुई गावातील सरपंचाने वाढदिवसानिमित्त एअरगनमधून हवेत गोळीबार करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था प्रश्नांकित झाली असताना सरपंच-उपसरपंचांच्या अशा महाप्रतापामुळे पोलीस यंत्रणेच्या वचकावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.