कोल्हापूर शहरात दोन मंडळांमध्ये झालेल्या हाणामारीत वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून,या घटनेतून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे चित्र समोर आले आहे.राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रगत विचारांच्या जिल्ह्यात धार्मिक एकात्मतेला तडा देण्याचा प्रयत्न ज्या समाजकंटकांकडून झाला त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशा मागणीचे निवेदन आज रविवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजता कुरुंदवाड पोलीस ठाण्याला देण्यात आले.