भंडारा तालुक्यातील दवडीपार बाजार येथील दर्ग्याजवळ धावत्या मोटरसायकली समोर चितळ आडवा आल्याने झालेल्या अपघातात सीआरपीएफ जवान ठार झाल्याची घटना दिनांक 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता दरम्यान उघडकीस आली आहे. दयालराव रामचंद्र क्षीरसागर वय अंदाजे 47 वर्षे रा. शहापूर असे मृतक सीआरपीएफ जवानाचे नाव आहे. दयालराव क्षीरसागर हे गडचिरोली येथे सीआरपीएफ मध्ये कार्यरत होते. दरम्यान ते एमएच 36 बी 5985 या खाजगी मोटरसायकलीने पवनी ते भंडारा मार्गे शहापूर येथे सुट्टीवर जात असताना 20 ऑगस्ट रोजी सायंकाळ..