अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज दिनांक २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजे दरम्यान खामगाव शहर व खामगाव तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून विजांच्या कडकडासह खामगाव शहर व खामगाव तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. या जोरदार पावसामुळे खामगाव शहरातील नाल्यांना मोठा पूर आला . तसेच काही दुकानांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांचे मोठे नुकसान सुद्धा झाले आहे. आज दिनांक 29 ऑगस्ट पर्यंत ३७२.६ मिमी पाऊस शहरात पडल्याची खामगाव बाजार समितीमध्ये नोंद असल्याची माहिती मिळाली आहे.