जाळीचा देव येथे 26 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता श्री चक्रधर स्वामी यांच्या 105 अवतार दिन उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेचे अध्यक्ष श्री लोणारकर बाबा महानुभाव गोपाल आश्रम यांच्या हस्ते बुलढाणा येथील सर्पमित्र श्रीराम रसाळ यांना प्रशस्तीपत्र ,शाल ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.