मुंबईतील सीएसएमटी, मरिन ड्राईव्ह, फ्लोरा फाऊंटनसह दक्षिण मुंबईतून आंदोलकांना हटवा, असे आदेश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला आज दिनांक १ सप्टेंबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास दिले आहेत. उद्या 7 दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन होते, त्यामुळे न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत निर्देश दिले आहेत. तसेच आणखीन मोठ्या संख्येने आंदोलन मुंबईच्या दिशेने येत असून या सर्व आंदोलकांना ठाण्यातच रोखा असे आदेशही मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.