सध्या विविध शैक्षणिक कामांसाठी जात प्रमाणपत्रे व जात वैधता प्रमाणपत्रे मागणीचे प्रस्ताव विद्यार्थी, पालकांकडून दाखल होत आहेत. हे प्रस्ताव प्राधान्याने निकाली काढून पात्र अर्जदारांना प्रमाणपत्रे वितरीत करण्याची कार्यवाही गतिमान करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.