भंडारा व नागपूर जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य करून न्याय देण्याबाबत कार्यकारी अभियंता गोसेखुर्द पुनर्वसन विभागीय पथक नागपूर यांच्याशी दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजता दरम्यान बैठक पार पडली. ही बैठक मुख्य अभियंता गोसेखुर्द प्रकल्प जलसंपदा विभाग नागपूर यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये भंडारा जिल्ह्यातील 22 तर नागपूर जिल्ह्यातील 7 ते 8 गावांच्या पुनर्वसनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.