माजलगाव धरण परिसरात वाढलेल्या पाणलोट क्षेत्रामुळे धरणाचे १२ दरवाजे प्रशासनाच्या नियंत्रणाखाली उघडण्यात आले आहेत. यामुळे तब्बल ८८ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सिंदफणा नदीच्या पात्रात सोडण्यात आला आहे. या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाण्याची पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अत्यंत खबरदारी बाळगावी, असे प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, नदीकाठावरील शेतकरी, मच्छीमार आणि नागरिकांनी नदीपात्राजवळ न जाण्याचे तसेच अनावश्यक धोका पत्करू नये, असे स्पष्ट न