पैगंबर जयंतीनिमित्त हेरवाड गावात उत्साहपूर्ण वातावरणात धार्मिक सलोखा जपत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या विशेष प्रसंगी आज शुक्रवार, दि. 5 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते जिलेबी वाटप करून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमास गावातील नागरिक, मुस्लिम समाजाचे बांधव तसेच विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले, "पैगंबरांच्या शिकवणी समाजात बंधुभाव, ऐक्य आणि शांततेचा संदेश देतात.