भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील रस्ते पूर्णतः खड्डेमय झालेले असून भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी अनेकदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना अनेकदा निर्देश केले. जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे खासदार पडोळे यांनी दि. 3 जून रोजी दु. 4:30 वा. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेत भंडारा जिल्ह्यातील विविध समस्यावर चर्चा केली. भंडारा शहरातील बऱ्याच प्रभागातील रस्त्याची पाहणी केली. बऱ्याच समस्या आढळून आल्या.