मारवाडी प्रेस गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात विक्रमी २८४ बाटल्या रक्तदान झाले. गणेशोत्सव प्रांगणात पार पडलेल्या या शिबिरात नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. दमानी नेत्र रुग्णालयाच्या सहकार्याने नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात ५८ रुग्णांची नोंदणी झाली. तसेच हृदयरोग, मधुमेह, दंतरोग, अस्थीरोग, चर्मरोग आदी आजारांची मोफत तपासणी करण्यात आली. खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल आदींनी शिबिराला भेट देऊन प्रशंसा केली. मंडळाने गणेशोत्सवात ग