टेंभी नाका येथे दरवर्षी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने शारदीय नवरात्र उत्सव आयोजित केला जातो. नवरात्र उत्सव काही दिवसावर येऊन ठेपल्यामुळे त्याची तयारी सुरू झाली आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या हस्ते टेंभी नाका येथे विधीवत पाटपूजन करून मंडपाच्या कामाचा शुभारंभ एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार नरेश मस्के आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.