शेगाव शहरातील नागझरी रोड वरील तीन पुतळ्यासमोर, मुख्य रस्त्याच्या मधोमध एका चेंबरवर सिमेंटचे झाकण व्यवस्थीत बसविण्यात आलेले नसल्याने ते उंच अवस्थेत आहे, त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच एखाद्या वाहनाची धडक लागून अपघाताची शक्यता आहे.सदर सिंमेटचे झाकण व्यवस्थीत बसविण्यात यावे, जेणेकरून वाहतूकीस कोणताही अडथळा होणार नाही, अशी मागणी भीम आर्मी तालुकाध्यक्ष भाई कमलाकर शेगोकार यांनी नगर परिषद. मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली.