हैदराबाद गॅझेट नोंदीच्या आधारे बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात सामावून घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीसाठी श्रीकांत राठोड आणि हरीश राठोड हे समाजबांधव मागील तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे आमरण उपोषणास बसले आहेत. उपोषणाच्या तिसर्या दिवशी शनिवार दि. 13 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता समाजाच्या हक्कासाठी लढा देणार्या या दोन्ही उपोषणकर्त्यांची तब्येत चिंताजनक होत चालल्याने त्यांच्या आरोग्याची विचारपूस करण्यासाठी विविध मान्यवर भेटीसाठी आले.