पाच सप्टेंबरला दुपारी दीड वाजताच्या सुमारास पोलीस ठाणे बेलतरोडी हद्दीतील महालक्ष्मी सोसायटी येथील बांधकामाच्या ठिकाणी बिल्डिंगच्या दुसऱ्या माळ्यावर रवी शरणांगत व त्यांचे चुलत भाऊ राहुल शरणांगत हे प्लंबिंग चे काम करत असताना राहुल यांचा पाय घसरल्याने तिथून जाऊन बिल्डिंगच्या दुसऱ्या माळ्यावरून खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता तायवाडे हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी बेलतरोडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.