याबाबत माहिती मिळताच तात्काळ मुख्य भोसरी उपकेंद्राची अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी रवाना झाले. अग्निशामक जवानांनी शटर तोडून आत प्रवेश केला. विद्युत पुरवठा बंद करून डिलिव्हरी लाईन व रील होजच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली.दुकानात मोठ्या प्रमाणात कार स्पेअर पार्ट्सचा साठा होता. मात्र वेळेत नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलाच्या तात्काळ कारवाईमुळे या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.