वाघोली-उबाळेनगर येथे कोजागिरी पौर्णिमेला देवीच्या मिरवणुकीत नितीन पवार या तरुणाला शॉक लागून त्याचा मृत्यू झाल्या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदास शिवतेज मित्र मंडळाचे पदाधिकारी, ट्रॅक्टर चालक, साऊंड व सजावटीचे स्ट्रक्चर लावणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.