मराठ्यांना ईडब्ल्यूएस मधून दिलेले दहा टक्के आरक्षण नको आहे का? असा प्रश्न छगन भुजबळ यांनी केला होता. व मराठा नेत्यांनी याच्यावर उत्तर द्यायला पाहिजे असे ते म्हणाले होते. यावर बोलताना सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, मी यावर उत्तर देणार नाही. आमची जी समिती आहे त्या समितीचे अध्यक्ष आहेत विखे पाटील ते याचे उत्तर देतील. असे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली.