ठाणे जिल्ह्यात आज 28 सप्टेंबर रोजी रेड अलर्ट जारी असून 24 तास अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यानुसार ठाणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. ठाणे शहरातील सर्व भागांमध्ये मुसळधार पावसामुळे सर्व नद्या ओव्हर फ्लो झाल्या आहेत तसेच अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.तानसा नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली असून वाड्यातील सावरोली पूल पाण्याखाली गेला आहे आणि त्यामुळे ठाणे कल्याण कडे जाणारा महत्त्वाचा मार्ग बंद झाला आहे त्यामुळे नागरिकांनी जीव धोक्यात घालू नये असे आव्हान केले आहे.