राजुरा-आसिफाबाद मार्गावर निर्भय पेट्रोलपंपाजवळ काल दि.30 आगस्टला रात्री 9 वाजता भरधाव ट्रकने हायवाला धडक दिल्याने कंडक्टर अजय आत्राम (वय 25) जागीच ठार झाला तर शंकर आत्राम गंभीर जखमी झाला असून त्याला चंद्रपूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले.अपघातानंतर ट्रक चालक वाहन टाकून फरार झाला आहे. सदर घटनेची नोंद राजुरा पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.