उदगीर शहरातील येरमेनगर येथे वस्तीगृह अधिक्षक आशिष ज्ञानोबा केंद्रे वय २५ वर्षे यास फोन करुन घरातून बोलावून घेऊन घरासमोरच आरोपीने १९ जून २०१८ रोजी रात्री नऊच्या सुमारास हात उसने कर्जाच्या रक्कमेच्या वादातून मयतास छातीवर, पोटावर चाकूने वार करुन खून केला.याप्रकरणी शुक्रवारी १२ सप्टेंबर रोजी उदगीर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने साईनाथ गोपीनाथ इंगेवाड,व सागर संतोष डोंगरे यांना जन्म ठेपेची शिक्षा व दहा हजार रुपये दंड ठोठावला आहे,सत्र न्यायाधीश वाय,बी,गमे यांनी शिक्षा सुनावली.