जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटिल यांच्या मुंबई आझाद मैदान येथील आमरण उपोषणाला पाठिंबा देत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर आमरण ऊपोषण सुरू केलेले उपोषणकर्ते दत्ता सुर्यवंशी यांनी आज सायंकाळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुरज गुरव यांच्या हस्ते ज्युस पिऊन आपले आमरण ऊपोषण आज सायंकाळी स्थगित केले आहे. सरकारने मनोज जरांगे पाटिल यांच्या उपोषणाची दखल घेऊन अध्यादेश काढला त्याबद्दल आभार व्यक्त करत सुर्यवंशी यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली आहे.