नेमळे-फौजदारवाडी येथे एका घराच्या पडवीत आज रविवार ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता माणसाचा सांगाडा आढळून आला. अर्जुन बाळा राऊळ (वय ५१) या मृत व्यक्तींचा हा सांगाडा आहे. आजारपणामुळे त्यांचा महिनाभरापूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान पडवीत असलेली सांगाड्याची हाडे प्राण्यांनी खाऊन विखरून टाकली. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.