भडगाव वार्ताहर — तालुक्यातील वाडे येथील श्री. हनुमान विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नवनिर्वाचीत चेअरमन पदि उदयसिंग बाबुसिंग परदेशी यांची तर व्हाईस चेअरमन पदि केशरबाई लक्ष्मण माळी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. विजय रामलाल परदेशी यांनी ठरल्या प्रमाणे चेअरमन पदाचा तर साहेबराव कौतीक माळी यांनी व्हाईस चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने या दोघ रिक्त जागेसाठी हा निवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नवनिर्वाचीत चेअरमन उदयसिंग परदेशी व व्हाईस चेअरमन पदि केशरबाई चा सत्कार केला,