अमृतधाम लिंक रोड ते जत्रा चौफुली परिसरातील फेनिंग रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत हॉकर्स बसल्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत होता. वाहनचालक व नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याने अखेर अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली.या मोहिमेमुळे रस्ता मोकळा झाला असून नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.