भंडारा जिल्ह्यातील नेहरू ग्राऊंड तुमसर येथे दिनांक 24 ऑगस्ट रोजी दुपारी 4 ते सायं. 7 वाजता दरम्यान विशाल दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हे आयोजन यासीन अँड वसीम ट्रान्सपोर्ट व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार राजू कारेमोरे हे उपस्थित होते. या उत्सवात प्रथम पुरस्कार 55 हजार 555 रुपये, द्वितीय पुरस्कार 33 हजार 333 रुपये व तृतीय पुरस्कार 11 हजार 111 असे पारितोषिक ठेवण्यात आले होते.