जिल्हाधिकारी कार्यालय भंडाराच्या परिपत्रकानुसार तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकाराने भंडारा जिल्ह्यातील नागरिकांच्या शासन आणि प्रशासन स्तरावरील प्रलंबित कामकाजाचे तातडीने निवारण करण्यासाठी दर सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत भंडारा जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांमध्ये तालुकास्तरीय जनता दरबार आयोजित करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने आज दि.08 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 1 वाजता पर्यंत तहसील कार्यालय भंडारा येथे जनता दरबाराच्या आयोजन करण्यात आले.