रत्नागिरी जिल्ह्यात दि.03 ते 15ऑगस्ट या कालावधीत "अंगदान जिवन संजीवनी अभियान "राबविण्यात येत असून याचा शुभारंभ दि. 03ऑगस्ट रोजी जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भास्कर जगताप आणि वरीष्ठ अधिकारी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आला.या प्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ विकास कुमरे यांनी उपस्थितांना अवयव दान ची आवश्यकता व प्रक्रिया याबाबत माहिती दिली.या अनुषंगाने जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.