कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास 36 तासापासून पावसाची उघडीप होऊन सुद्धा शिरोळ, हातकणंगले, मिरज पलूस या तालुक्यामध्ये कृष्णा,वारणा,पंचगंगा व दूधगंगा या नद्यांच्या पाण्याची पातळी कमी होत नाही.तर पाणी पातळीत वाढ होत असून या वाढत चाललेल्या पाणी आणि याचं मुख्य कारण पाण्याच्या प्रवाहाला निर्माण झालेले अडथळे आणि त्यामुळेच पाऊस थांबून सुद्धा पाणी पातळीत घट होत नाही.भविष्यात शक्तिपीठ महामार्ग झाला तर बुधगाव ते दानोळी हा रस्ता होत असताना जवळपास 15 किलोमीटरचा पन्नास फूट उंचीचा भराव पडणार आहे.