पाणवठ्या जवळ गायरान जागेत युरिया खतात मीठ मिसळून जाणून-बुजून ठेवले हा खत खाल्ल्याने तीन मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना जिंतूर तालुक्यातील इटोली शिवारातील साईनगर तांडा परिसरात 9 सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता उघडकीस आली.या प्रकरणी 11 सप्टेंबरला दुपारी तीनच्या सुमारास अज्ञातावर जिंतुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.