सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अक्कलकोट व सांगोला तालुक्यातील अवैधरित्या वाळू तस्करी करणाऱ्या दोन इसमांना MPDA कायद्यान्वये पुणे येथील येरवडा जेलमध्ये स्थानबध्द केले आहे. सांगोला तालुक्यातील पप्पु शिवाजी इंगोले आणि अक्कलकोट तालुक्यातील अण्णाराव ऊर्फ पिंटु बाबुराव पाटील यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणणे, इच्छापुर्वक दुखापत करणे, अवैधरित्या वाळू उपसा करणे, वाळू वाहतूक करणारे वाहन चोरी करणे, खुनाचा प्रयत्न, अग्नशस्त्र बाळगणे, बोटीच्या सहाय्याने वाळू चोरी करणे अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.