शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकत्याच झालेल्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपला रक्त आणि क्रिकेट एकत्र कसं चालतं अशी टीका करण्यात आली आहे. यावर खासदार विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी प्रत्युत्तर दिले आहे. निकम म्हणाले, आम्ही पाकिस्तान सोबत शत्रुत्व नक्की ठेऊ मात्र त्या खेळण्यात चांगले खेळाडू म्हणून वागू पाकिस्तानच्या कुरापती कधीच विसरू शकत नाही. पाकिस्तानच्या कुरापतीला आपण उत्तर दिलं आहे.