दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे इंद्रप्रस्थ भवन येथे आयोजित कला प्रदर्शनीस आमदार साजिद खान पठाण यांनी भेट देऊन संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक केले. डॉ. विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या पूजा साहित्य व कलात्मक वस्तूंचे त्यांनी निरीक्षण केले. दिव्यांगांच्या शिक्षण, रोजगार व आरोग्यासाठी फाउंडेशनचे कार्य भरीव असल्याचे सांगत अकोल्यातील नागरिकांनी संस्थेला सहकार्य करावे, तसेच शासनस्तरावरही मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या वेळी संस्थेचे सदस्य व प