मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात सुरू केलेल्या उपोषणाला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. लाखो मराठा बांधव त्यांच्या समर्थनार्थ मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, मुंबईतील हॉटेल्स व अनेक दुकाने बंद असल्याने मराठा बांधवांवर अन्न-पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर "प्रत्येक घरातून एक शिदोरी" या कोपरगाव सकल मराठा समाजाच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.