आज दिनांक 3 ऑगस्टला पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, शिरसगाव कसबा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील, पळसपाडा शेतशिवारातून इलेक्ट्रिक केबल व झटका मशीन चोरीला गेल्याची घटना दिनांक दोन ऑगस्टला सकाळी नऊ वाजता वडकीस आली आहे. याबाबतीत रविकिरण सुरेशराव लकडे राहणार कविठा यांनी दिनांक दोन ऑगस्टला रात्री नऊ वाजून सात मिनिटांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध शिरसगाव कसबा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे