राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन नाशीक येथे भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला यशस्वी केल्याबद्दल राष्ट्रवादी कांग्रेसतर्फे शहरातील पक्षाचे जेष्ठ नेते तथा प्रदेश सरचिटणीस मुनाज शेख यांचा मुंबई येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मुनाज शेख यांच्याकडे मध्य नाशिकचि जबाबदारी देण्यात आली होती.