जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने कहर केला असून पाचोरा शहरासह तालुक्यातील म्हसाळा, सार्वे पिप्री, सातगाव डोंगरी, पिंपळगाव, यासह परिसरातील अनेक गावांमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू असून मुसळधार पावसामुळे बहुळा, हिवरा व अग्नावती मध्यम प्रकल्प तसेच अनेक लघु प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने परिसरातील नदीला पूर आला आहे. तसेच हिवरा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने पाचोरा शहरातून वाहणाऱ्या हिवरा नदीला देखील पूर आला आहे.