अहिल्यानगरहून १०८ किलो गांजा घेऊन एक कार बीडकडे येत होती. पोलिसांना याची माहिती मिळताच सापळा लावला; पण संशय आल्याने चालकाने कार सुसाट पळवली. वळणावर नियंत्रण न आल्याने कार खड्ड्यात जाऊन अपघात झाला. यात दोन आरोपी जखमी झाले. एकाला छत्रपती संभाजीनगरला रेफर केले असून, दुसऱ्याला अटक केली आहे. ही कारवाई बीड तालुक्यातील नवगन राजुरी परिसरात स्थानिक गुन्हे शाखा व बीड ग्रामीण पोलिसांनी केली. बाबासाहेब विश्वनाथ दहातोंडे (वय ५५, रा. चांदा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) व दत्तू मुरलीधर