बटाणा गावात अचानक लागलेल्या आगीत तीन घर जळून खाक झाले त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे या घटनेत सचिन रहांगडाले नूतनलाल रहांगडाले आणि छत्रपाल रहांगडाले यांची घरे जळून खाक झाली आहेत अन्नधान्य आणि इतर आवश्यक वस्तू आगीत जळून खाक झाले आहेत सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही यावर तातडीने कारवाई करत आमदार विनोद अग्रवाल यांनी घटनास्थळी भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला आणि प्रशासनाला पंचनामा तयार करून बाधित कुटुंबांना तात्काळ भरपाई देण्याचे निर्देश दिले.