अलमट्टी व हिप्परगी धरणांमुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला दरवर्षी महापुराचा मोठा फटका बसतो आहे.यावर्षीही शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी परिसरात पुराचे पाणी मागील तीन दिवसांत केवळ 3 ते 4 फुटांनीच उतरले असून,पाणी उतरायची गती जवळपास थांबली आहे.त्यामुळे येथील शेती,घरं,उपनगरं, दुकाने आणि सामान्य लोकांचे हाल सुरुच आहेत.पाणी चढताना वेगाने वाढले, पण उतरण्याची गती खूपच संथ आहे.हिप्परगी आणि अलमट्टी धरणाचे बॅकवॉटर, तसेच धरणाजवळील भराव या परिस्थितीस कारणीभूत ठरत असल्याचे स्पष्ट दिसून येते.