दर्यापूर येथील ग्रीनलँड सिटी येथे राहणाऱ्या वर्ग बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल गुरुवार रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली.तेजस जितेंद्र खारोडे (१७) रा. ड्रिमलँड सिटी,दर्यापूर असे गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे. तेजसने स्वतःच्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.सकाळी तो घरातील एका रूममध्ये होता आणि दरवाजा बंद होता.सकाळी बराच वेळ तो बाहेर न आल्याने आई- वडिलांनी त्याला आवाज दिला मात्र आतूनच उत्तर मिळाले नाही.