भंडारा तालुक्यातील मानेगाव बाजार येथील बबन नथू भदाडे वय 52 वर्षे हे दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता दरम्यान मानेगाव बाजार शेत शिवारात शेळ्या चारण्यास गेले होते. दुपारच्या सुमारास विजेच्या कडकटासह पावसाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे त्यांच्या शेळ्या घरी परतल्या. मात्र, सायंकाळ पर्यंत बबन हे घरी परत न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी मानेगाव बाजार शेतशिवारात त्यांचा शोध घेतला असता एका शेतकऱ्याच्या शेत बांधिच्या धुऱ्यावर बबन हा पडलेल्या स्थितीत मृतावस्थेत दिसून आला.