जिल्हा पोलिस अधीक्षक अर्जित चांडक यांनी २ सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास जवाहर नगर येथील तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीच्या कार्यालयाला भेट देत गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सोसायटीतर्फे प्रकाशित ‘आरती संग्रह’ पुस्तकाचे विमोचन केले. या प्रसंगी पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते. धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांतून समाजात सकारात्मक संदेश जात असल्याचे मत अधीक्षक चांडक यांनी व्यक्त केले.